ताज्या बातम्या

कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढ शेतकऱ्यांवर अन्यायकारक

By admin

August 21, 2023

agri minister on onion export कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढ शेतकऱ्यांवर अन्यायकारक

परळी

onion on agri minister केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कात 40 टक्के वाढ केल्यामुळे हा शेतकऱ्यांवर अन्याय असून हे वाढ कमी करण्यासाठी आपण दिल्ली येथे कृषिमंत्री आणि पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे. केंद्र सरकारने निर्यातीवर 40% टक्के वाढ करण्याचा निर्णय शेतकरी आणि onions कांदा उत्पादक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. या संदर्भात आपण  केन्द्रिय् कृषी मंत्र्यांशी बोललो असून उद्या याचं साठी दिल्लीला जाणार आहे. हे निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करणार आहे. तसेच राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने असून् शेतकऱ्यांच नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाव पडणार याची आम्ही काळजी घेणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आणि बाजार समित्यांनी आंदोलन न करता मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान कांदा निर्यातीचे शुल्क 40 टक्के वाढविण्यात आल्यामुळे बाजारातील कांद्याचे भाव कोसळतील अशी शेतकरी आणि शेतकरी संघटनांना भीती आहे.