ताज्या बातम्या

तब्बल! एक कोटीची लाच घेताना सहायक अभियंता जाळ्यात

By admin

November 04, 2023

 

अहमदनगर

Acb trap in ahmednagar शेंडी बायपास जवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना  नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. राज्यातील इतकी मोठी लाच घेण्याची ही पहिली कारवाई आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.  या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे.

यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते या कामाची रक्कम तब्बल 2 कोटी रुपये बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउट वर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताचे स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे अशी माहिती नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत तत्कालीन अधिकारी वाघ यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली होती.