acb ahmednagar trap 2 women engineers caught

ताज्या बातम्या

62 हजार रुपये लाच म्हणून घेताना जलसंपदा विभागातील 2 महिला अभियंते जाळ्यात

By admin

April 19, 2024

 

 

अहमदनगर

acb ahmednagar trap 2 women engineers caught कंत्राटदाराकडून बिलाच्या १८ % रक्कम लाच म्हणून घेताना जलसंपदा विभागातील २ महिला अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. पहिला हप्ता म्हणून ६२ हजार रुपये घेताना नगरच्या सहायक अभियंता आणि नाशिकच्या कार्यकारी अभियंता यांना लाच घेताना पकडले.ही लाच कंत्राटदाराचे राहुरी तालुक्यातील कामासाठी ही लाच मागण्यात आली होती.

काँग्रेसला खिंडार, उत्कर्षां रुपवते यांचा वंचित मध्ये प्रवेश

सहायक अभियंता रुबीना शेख आणि कार्यकारी अभियंता रजनी पाटील अशी महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत. शेख यांच्या साठी ८ % तर पाटील यांच्यासाठी १०% अशी लाचेची रक्कम ठरली होती.नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.