स्वर्णिम विजय वर्षाच्या निमित्ताने सायक्लोथॉन चे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -

सायक्लोथॉन

नगर दि 31 जाने,प्रतिनिधी

एम आय आर सी मध्ये स्वर्णिम विजय वर्षाच्या निमित्ताने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

 

सायक्लोथॉन

भारत-पाक युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अहमदनगर येथील एम आय आर सी च्या वतीने स्वर्णिम विजय वर्ष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये या चे आयोजन करण्यात आले.

अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने अहमदनगर येथील मेकॅनैझड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांच्यावतीने या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आज झालेल्या कार्यक्रमात सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. विशिष्ट सेवा मेडल प्राप्त ब्रिगेडियर विजयसिंह राणा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

सायक्लोथॉन

विविध विभागातील , विविध वयोगटातील महिला आणि पुरुष यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

त्याचबरोबर सशस्त्र सेना दलाचे जवान ही यामध्ये सहभागी झाले होते. ब्रिगेडियर विजयसिंह राणा यांच्या हस्ते प्रथम आलेल्या महिला आणि पुरुष सायकलिस्ट ला पारितोषिके देण्यात आली.

 

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles