75 मिटर्स तिरंगाध्वज

ताज्या बातम्या

अतिभव्य नेत्रदीपक 75 मिटर्स तिरंगाध्वज पदयात्रेने आष्टीवासीयांचे लक्ष वेधले

By admin

August 11, 2022

आष्टी( प्रतिनिधी )

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी केलेल्या आवाहना नुसार “हर घर तिरंगा ” अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या आवाहनानुसार लातुर,उस्मानाबाद,बीड मतदार संघाचे भाजपाचे आ.सुरेश धस यांनी आष्टी शहरात 75 मिटर्स तिरंगाध्वज ध्वजासह पदयात्रेचे आयोजन अत्यंत भव्यदिव्य आणि नीटनेटक्या पद्धतीने करून आष्टी वासियांना या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. संपूर्ण आष्टी शहरामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करत या पदयात्रेचे आष्टी शहरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला. आ. सुरेश धस यांच्या नियोजनाचे कौतुक आष्टीवासीयांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “आजादी का अमृत महोत्सव देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केल्यानंतर हर घर तिरंगा अभियानांतर्गत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा  पंचायत समिती कार्यालय,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,आष्टी शहर मेन रोड, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय मार्गे आ.सुरेश धस यांच्या निवासस्थानी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

विद्यार्थ्यी नागरीकांनी 75 मीटर लांबीचा झेंडा हातात उचलून धरत गावातून फेरी काढली. या अनोख्या फेरीत ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला. भारत माता की जय, हर घर तिरंगा अशा घोषणांचा जयघोष करत संपूर्ण ही फेरी काढण्यात आली. देशभक्तीची भावना विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.बेन्जोवरती देशभक्ती पर गिताने देशभक्ती मय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी भाजपच्या पदयात्रेत नगराध्यक्ष, रंगनाथ धोंडे, शैलेश सहस्रबुद्धे, सभापती बद्रीनाथ जगताप,संजय आजबे,गणेश शिंदे,सतिष धस,यशवंत खंडागळे,पत्रकार उत्तम बोडखे,नितिन मेहेर,अनिल ढोबळे,संजय ढोबळे,भगवानराव

सांगळे,परिवंत गायकवाड,केशव बांगर, बाळासाहेब नागरगोजे,हनुमान गायकवाड,संजय गायकवाड,भगवान शिनगिरे, अमोल शिंदे,दत्ता जेवे,अजित घुले,राम धुमाळ,जिया बेग,अक्षय धोंडे, गंगाधर पडोळे, सचिन लोखंडे, दिपक निकाळजे,

सुनिल सानप, संदीप खाकाळ, सुधिर पठाडे,संतोष मेहेर,प्रितम बोगावत,पत्रकार सचिन रानडे,प्रविण पोकळे,गणेश दळवी, शरद रेडेकर,आत्माराम फुंदे, संदीप कारंजकर,बाळासाहेब कर्डीले,आदीसह या पदयात्रेस अनिषा ग्लोबल स्कुल आष्टी,वसुंधरा विद्यालय आष्टी,कन्या प्रशाला आष्टी,जि.प.प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय,श्री गणेश विद्यालय,आझाद उर्दू स्कुल,टायगर अकॅडमी या शाळेमधील शिक्षक,शालेय विद्यार्थी,यांच्यासह व्यापारी,पत्रकार, भाजप कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह आष्टी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

eknath shinde news ईडीच्या कारवाईला घाबरून आमच्याकडे येऊ नका-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे