ताज्या बातम्या

राज्यातील महापौर पदाची सोडत गुरुवारी

By admin

January 19, 2026

मुंबई :

29 munciple Mayor reservation राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या गुरुवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे.

राज्यात नुकतेच २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. भाजपसह सत्ताधारी महायुतीने बहुतांश महापालिकेत घवघवीत यश मिळविले आहे. महापालिका नोवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता गुरुवारी महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महापालिकामधे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल.