सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी
नवी दिल्ली
मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांच्याकडून पाच सदस्य घटनापीठाचे गठन करण्यात आले असून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी आज होणार आहे.त्यामुळे सर्वांना या बाबत उत्कंठा आहे.
शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून कधी सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमन्ना निवृत्त झाल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती पदाचा पदभार उदय लळीत यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी पाच न्यायमुर्ती चे घटनापीठ स्थापन केले.
त्यामध्ये न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह,न्यायमूर्ती कृष्णा मुरारी,न्यायमूर्ती हिमा कोहली,न्यायमूर्ती पी श्री नरसिंह यांचा समावेश आहे.
drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा