ताज्या बातम्या

माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्याच्या मागणी साठी तरूणाचा मोबाईल टॉवर वर ठिय्या.

By admin

July 21, 2022

 

माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्याच्या मागणी साठी तरूणाचा मोबाईल टॉवर वर ठिय्या.

जालना

माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्याच्या मागणी साठी तरूणाचा 4 तास मोबाईल टॉवर वर ठिय्या. गावकऱ्यांचा जीव टांगणीवर लावून युवकाची शोलेगीरी. उपस्थितांनी त्याची मजा घेत तुला आमदार करू, खाली उतर म्हणण्याचा सुध्दा त्याच्यावर झाला नाही परिणाम… माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा,मला घरकुल द्या या मागणीसाठी एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकला आणि गावकऱ्यांचा जीव टांगणीला लावला.जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावात ही शोले स्टाईल घटना घडलीय. गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे.या तरुणाने 4 तास दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर मुक्काम ठोकल्यानं घटनास्थळी जमा झालेल्या नागरीकांमध्ये घबराट पसरली होती.सर्व यंत्रणांनी प्रयत्न करूनही हा तरुण खाली आला नाही.अखेर स्वतःहून 4 तासानंतर तो टॉवरवरून खाली आल्यानं उपस्थित नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला. दारूच्या नशेत गणपत बकाल हा 4 वाजेच्या सुमारास गावातीलच मोबाईल टाॅवरवर चढला. गावातील लोकांना त्याने मला घरकुल पाहिजे.माझी बायको मला सोडुन माहेरी गेलेली आहे तिला माझ्या कडे परत आणा.अशी मागणी केली. गावकऱ्यांनी त्याला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले.पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. मात्र पोलिसांकडून ही तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्नीशमन दलाचे पथक मागविण्यात आले तेही त्याच्यासमोर हतबल झाले.गणपत हा दारूच्या नशेत असल्यानं अनेकांनी त्याची मजा घेतली.”तुला आमदार करतो, खाली उतर” अशी गळ घातली पण तरीही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही.पण तब्बल 4 तासाने तो टॉवर खाली उतरला.त्यांनतर बदनापूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला अविनाश साबळे शी संवाद