मराठवाडा शिक्षक संघ

आरोग्याची काळजी

मराठवाडा शिक्षक संघाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी अशोक गाडेकर शिवाजी ढोबळे तालुकासचिव

By admin

August 11, 2022

 

आष्टी मराठवाडा शिक्षक संघाची आष्टी तालुका कार्यकारिणी आज निवड करण्यात आली.  तालुका अध्यक्ष पदी अशोक गाडेकर तर तालुका सचिव पदी शिवाजी ढोबळेयांची निवड करण्यात आली. मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डी.जी. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक टी आर .इजारे , माजी मुख्याध्यापक करपे सर,झगडे सर,खलासे सर,गणेश विद्यालय आष्टी चे मुख्याध्यापक देसुरकर सर,सुभाष चंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक डोके सर, प्रा. दत्ता नरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश विद्यालय आष्टी येथे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी, सभासदांच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीचे प्रास्तविक जिल्हा मार्गदर्शक टी .आर इजारे यांनी केले त्यांनी नुतन कार्यकारिणीचा प्रस्ताव मांडला.

 

तालुका उपाध्यक्ष कृष्णा जाधव, पोकळे हनुमंत, थोरवे विजयकुमार ,सहसचिव संभाजी गर्जे, शेळके दादासाहेब, कोषाध्यक्ष सय्यद सफियोद्दिन, कार्याध्यक्ष तरटे रविकांत,प्रसिद्धी प्रमुख मनोज सातपुते यांची तर सदस्य पदी श्रीमती स्वाती चौधरी, होळकर संदीप, गावडे संदीप, करडकर दत्तात्रय, दातार नवनाथ,मोहसीन गालेब,सुंबरे निळकंठ,अन्सारी तकीयोद्दिन, सय्यद अजीमोद्दीन , वराट सतिश,आबदार लिंबाजी यांची निवड करण्यात आली. यावेळी अन्सारी टी.एम., शेळके नागेश,पठाण जावेद, फारोकी एम. आय. सय्यद ए.ए. यांनी उपस्थित पाहुणे व जिल्हा प्रतिनिधींचे स्वागत केले व कार्यक्रमाचे संचलन संदीप गावडे यांनी तर नूतन तालुकाध्यक्ष अशोक गाडेकर यांनी आभार व्यक्त केले.

drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा