बीड
beed loksabha coputerised mixing of vvpat लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 39 बीड मतदार संघातील मतदान यंत्रांचे प्रथमस्तरीय संगणीकृत सरमिसळ (1st Randomization) 10 एप्रिलला होणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सुरू झाल्या असून मतदान यंत्राचे प्रथमस्तरीय संगणीकृत सरमिसळ (1st Randomization) करण्यात येत असते 39 बीड मतदार संघाच्या मतदान यंत्राचे सरमिसळ बुधवार 10 एप्रिल रोजी होणार आहे.नियमानुसार यावेळी विविध राजकीय पक्षांचे सदस्य उपस्थित राहून स्वतः ही सरमिसळ पद्धत बघू शकतात .
बीड लोकसभेसाठी या नेत्याने केला उमेदवारीचा दावा
या प्रक्रिया अंतर्गत बॅलेट युनिट 3317 कंट्रोल युनिट 3569 व्हीव्हीपॅट मशीनची संगणीकृत पद्धतीने सर मिसळ केली जाईल. यामधून 2824 बॅलेट युनिट आणि 2824 कंट्रोल युनिट आणि 3059 व्हीव्हीपॅट चे संगणीकृत पद्धतीने सरमिसळ होणार असून यानंतर हे मतदान यंत्र विधानसभा निहाय वाटप करणेकरीता गोदाम उघडण्याची परवानगी व ईव्हीएम मशीन्स विधानसभा निहाय स्थलांतर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
त्याप्रमाणे बुधवारी 10 एप्रिलला सकाळी 11.00 वा. २२८-गेवराई, २२९-माजलगांव, २३०- बीड, २३१-आष्टी, २३२-केज, २३३-परळी विधानसभा मतदार विभागासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सचे प्रथम सळमिसळ (1 Randomization) आयोजित करण्यात आली आलेली आहे. सळमिसळ (1 Randomization) प्रक्रियेनंतर यानंतर या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि विहित कार्य पद्धतीप्रमाणे योग्य त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येतील अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.