ताज्या बातम्या

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अंतराळामध्ये एका तार्‍याचे नामकरण

By admin

December 25, 2022

 

 

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अंतराळामध्ये एका तार्‍याचे नामकरण

छत्रपती संभाजीनगर

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी , जब तक सुरज ,चांद रहेगा ,अटलजी आपका नाम रहेगा , ही अजरामर घोषणा भाजप शहराच्या वतीने देऊन अटलजी यांच्या नांव एका तार्‍याचे नामकरण केले,

या विषयाची माहिती देण्या साठी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी भाजप कार्यलयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली

या वेळी , छत्रपती संभाजी नगर शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या मार्गदर्शनात शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने , स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती शहरांमध्ये विविध कार्यक्रम करून तसेच मंडल नुसार व  बूथ स्तरावर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,भाजप शहर च्या वतीने अभिवादन करून साजरी करण्यात आली ,

हे करत असताना भाजप पदाधिकारी एडवोकेट .निनाद खोचे यांनी एका विशेष कार्यक्रमांतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अंतराळामध्ये एका तार्‍याचे नोंदणी करून त्याला ,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त भाजप संभाजी नगरच्या वतीने त्यांना अभिवादन केले ,

आंतरराष्ट्रीय अंतराळ मध्ये एका ताऱ्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असे नाव देण्यात आले , हा तारा पूर्व दिशेला सकाळी चार ते चार वाजून बारा मिनिटापर्यंत प्रखरतेने दिसतो , याचे पृथ्वीपासूनचे अंतर 392.01 प्रकाश वर्षे एवढे दूर आहे, हा तारा सूर्या जवळ आहे , या तार्‍याची नोंदणी इंटरनॅशनल स्पेस वर रजिस्ट्री केली आहे ,

हा तारा  बघण्या साठी .अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या 98 व्या जयंती निमित्त त्यांचे नाव एका ताऱ्याला देण्यात आले आहे .

ह्याबद्दल ,आपण सर्वांनी त्या बद्दल www.space-registry.org ह्या website वर जाऊन माहिती घेऊ शकता registry key No – CX16408US वेबसाईटवर जाऊन बघता येईल ,या ताऱ्याची रजिस्ट्री नंबर हा CX16408 US हा आहे. याच पद्धतीने भारतामधील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील आंतरराष्ट्रीय अंतराळामध्ये एका तार्‍याचे नामकरण झाले आहे.

, जप तक ,सुरज चांद रहेगा , अटलजी आपका नाम रहेगा , ही घोषणा खऱ्या अर्थाने शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजरामर केली ,असे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले.या वेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले .