बीडच्या अविनाशचा अटकेपार झेंडा ;रौप्य पदकाची कामगिरी
आष्टी बरमिंगम येथे होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा येथील अविनाश साबळेचा याने स्टीपल चेस या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे.अवघ्या 0.05 सेकंदात त्याचे सुवर्णपदक हुकले. मात्र त्याच्या या पदकाने बीड जिल्ह्यासह देशाची मान उंचावली आहे. त्यातील अविनाश साबळे यांना इंग्लंड येथे होत असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये स्टीपल चेस या प्रकारांमध्ये रौप्य पदक मिळवले. अविनाश साबळे यांच्या या कामगिरीमुळे भारताची मान पुन्हा एकदा उंचावली असून त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबद्दल बोलताना अविनाश साबळे याचा भाऊ योगेश साबळे यांनी सांगितले की, अविनाश ने अनेक दिवसापासून केलेली मेहनत कामी आली असून अविनाश ला सिल्वर पदक मिळालं.स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने पहिल्यांदा आपल्या वडिलांना फोन केला. त्यानंतरच आम्हाला याबद्दलची खात्री पटली. आम्ही अविनाश चा खेळ हा लाईव्ह सामने पाहत होतो. पदक जिंकलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला. सामने पाहत असताना आम्हाला पुढे मनामध्ये भीती वाटत होती की या वेळेला काय होईल. याबद्दल ची धाकधुक मनामध्ये होते. मात्र अविनाशच्या मेहनतीचं फळ त्याला कामा आले कामी आले. त्याने सराव केला होता. या सरावामुळे अविनाश ला त्याचा फायदा झाला असल्याचे योगेश यांनी सांगितले.