पंकजा मुंडे

ताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक नेते बा. म.पवार यांनी घेतले कोरोनात पितृछत्र हरपलेल्या दोन मुलांना दत्तक

By admin

July 27, 2022

 

आष्टी (प्रतिनिधी)

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादेगाव तालुका आष्टी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळाचे  शिक्षक नेते बा म पवार यांनी शालेय परिसरात पंकजाताई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून इयत्ता आठवी व इयत्ता सहावी वर्गातील बौद्ध समाजातील उद्धव अमर मस्के (इयत्ता आठवी), उज्वला अमर मस्के (इयत्ता सहावी) हल्ली मुक्काम दादेगाव तालुका आष्टी या दोन विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे .

दोन्ही विद्यार्थ्यांचे वडील कोरोना कालावधीत कोविड आजाराने मृत्यू पावले असले कारणाने वडिलांचे पितृछत्र हरपले आहे त्यामुळे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी समाज माध्यमावर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत सामाजिक उपक्रम राबवला असल्याचे बा. म. पवार यांनी सांगितले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक योगेश कोंडेककर, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब आंधळे उपमुख्याध्यापक नानासाहेब गायकवाड, माध्यमिक शिक्षक वैजनाथ घुमरे प्राथमिक पदवीधर धनंजय मुरटेकर, विजय आवटी , अंबादास घुले, मोहन जगताप गोरक्षनाथ तांदळे ,ज्ञानेश्वर सूर्यवंशी ,महादेव कोकरे शिक्षण प्रेमी नागरिक अशोक विधाते विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकी पेशाची नोकरी करत असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यासोबत व त्यांचे चळवळीतील कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांचे माध्यमातून वेळ मिळेल तिथे काम करत पंचवीस वर्ष सामाजिक कार्य करत विविध क्षेत्रात संघर्षाचे बाळकडू स्वर्गीय मुंडे साहेबाकडून मिळाले असल्याचे बा. म.पवार सर यांनी सांगितले.

जिल्ह्यात महाऊर्जेच्या ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ महोत्सवास सुरूवात