ताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा टाळले?

By admin

June 08, 2022

 

मुंबई भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी बीड जिल्ह्यातील भाजप नेत्यांची इच्छा होती.मात्र हाय कमांड ने इच्छा धुडकवत पंकजा मुंडे यांना डावलले. विधानपरिषद निवडणुकीसाठी आज भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. याशिवाय राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही.

याबद्दल माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंकजा यांना उमेदवारी मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल. पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे आणि इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात काहीही गैर नाही.

परंतु, भाजपमधील नाराजी ही, पाण्यातील एखादं जहाज क्रेनने उचललं तर पाण्यात पडणारा जो खड्डा असतो, तसाच लगेच भरला जाणारा असतो. त्यामुळे नाराजी ही तात्कालिक असते. आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळी कोरी पाकीटं असतो. जो पत्ता लिहील तो जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते.

पण निर्णय हा संघटना करते. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो.