बीड जिल्ह्यातील निर्बंध उद्यापासून शिथिल; रात्री १० पर्यंत राहणार सर्व सुरु
बीड – प्रतिनिधी
राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात सुरुवात केल्यानंतर बीड जिल्ह्यातील निर्बंध मात्र कायम होते. आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर निर्बंध हटविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांना दिलासा मिळाला आहे.
निर्बंध हटविताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना संबधीचे नियम पाळून दुकाने सुरु करायची असल्याचे निर्देश दिले आहेत. रात्री १० वाजेपर्यंत हे दुकाने आणि हॉटेल सुरु असणार आहेत ,मात्र त्यासाठी ५० टक्के क्षमतेची अट घातली आहे . व्यावसायिकांना आपल्या दुकानातील कामगारांना लसीच्या दोन मात्रा देण्याचे सांगितले आहेत.
निर्बंध उद्यापासून शिथिल; रात्री १० पर्यंत राहणार सर्व सुरु
सिनेमा गृहे आणि धार्मिक स्थळे मात्र पूर्णपणे बंद असणार आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील .मात्र त्यासाठी दुकान मालक आणि दुकानात काम करणारे कामगार यांच्या लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यात,तसेच दुकानात निर्जंतुकीकरण केलेलं असावे असे म्हटले आहे .
हॉटेल,बार ,रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात यावेत,तसेच लग्न कार्यासाठी जास्तीत जास्त 200 लोकांची उपस्थिती मान्य असेल .
आष्टीचा कोरोना बाधितांचा आकडा वाढला; जिल्ह्यात १३९
बीड जिल्ह्यातही पंधरा ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध उद्यापासून शिथिल
– सर्व दुकाने रात्री दहा पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
– मात्र, दुकानदार आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक
– हॉटेल आणि मॉलही रात्री दहापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेण्यास मुभा
– मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांनाही लसीकरण आवश्यक
– व्यायामशाळा, सलूनही रात्री दहापर्यंत मुभा
– खुल्या प्रांगणातील विवाहाला दोनशे जणांना मुभा
– मंगल कार्यालयात ५० टक्के
– चित्रपटगृह, नाट्यगृह बंदच
– सर्व धार्मिक स्थळेही बंदच राहणार