ध्वजारोहण

ताज्या बातम्या

कोण करणार कोणत्या जिल्ह्याचे ध्वजारोहण?

By admin

August 11, 2022

कोण करणार कोणत्या जिल्ह्याचे ध्वजारोहण?

राज्यातील मंत्रीमंडळाचे खाते वाटप अद्याप बाकी आहे.तसेच पालकमंत्री पदे ही रिकामी आहेत. मात्र या जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न होता. मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला असून मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्या सहीने राज्यातील जिल्ह्यांच्या ध्वजारोहण संदर्भात लिस्ट जारी करण्यात आली आहे.

15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांकडे पालकमंत्री पद येण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठीच त्यांच्यावर ध्वजारोहण करण्याची जबाबदारी दिली असावी.

 

कोणत्या जिल्ह्यामध्ये मंत्री करणार ध्वजारोहण ?

देवेंद्र फडणवीस    – नागपूर

सुधीर मनगुंटीवार – चंद्रपूर

चंद्रकांत पाटील – पुणे

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर

गिरीष महाजन – नाशिक

दादा भुसे – धुळे

गुलाबराव पाटील – जळगाव

रविंद्र चव्हाण – ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

दीपक केसरकर – सिंधुदुर्ग

उदया सामंत – रत्नागिरी

अतुल सावे – परभणी

संदीपान भुमरे – औरंगाबाद

सुरेश खाडे – सांगली

विजयकुमार गावित – नंदुरबार

तानाजी सावंत – उस्मानाबाद

शंभूराज देसाई – सातारा

अब्दुल सत्तार – जालना

संजय राठोड – यवतमाळ

 

अमरावतीमध्ये विभागिय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड या ठिकाणी  तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.

drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा