ताज्या बातम्या

ज्योती मेटे यांना आमदार करावे छञपती संभाजीराजे यांची मागणी

By admin

August 20, 2022

ज्योती मेटे यांना आमदार करावे- छञपती संभाजीराजे

बीड

छत्रपती संभाजी राजे यांनी आज लोकनेते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या बीड येथिल निवासस्थानी भेट घेवुन मेटे कुटुंबाचे सांत्वन केले.

यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष व संघटनेला टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळाल पाहिजे. तसेच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल .त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोठेही आमदारकी द्यावे अशी त्यांनी मागणी माध्यम प्रतिनिधी शी बोलताना केली.