ताज्या बातम्या

कै वसंतराव नाईक प्राथ.व माध्यमिक आश्रमशाळेत वसतिगृह विद्यार्थ्यासाठी योग शिबीराचे आयोजन

By admin

January 08, 2023

कै वसंतराव नाईक प्राथ.व माध्यमिक आश्रमशाळेत वसतिगृह विद्यार्थ्यासाठी योग शिबीराचे आयोजन

अंबाजोगाई वसतिगृह निवासी विद्यार्थ्यांचे मानसिक व शारिरिक आरोग्य चांगले रहावे व मुलांच्या सर्वांगीन विकास साधावा यासाठी भारत सरकार च्या आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य वर्धिनी उपकेंद्र राडी यांच्या सहकार्याने कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आनंदनगर, अंबाजोगाई येथे सकाळी ७ ते ८.३० या वेळेत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. या योग शिबीरात *आदरणीय योगगुरु उत्तरेश्वर पांचाळ* यांनी अगदि सोप्या पध्दतीने बालकांना योगासन , प्राणायाम व आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठीचे व्यायाम प्रकार व कृती समजुन देत मुलांकडुन उत्साहाने करवुन घेतले.

कार्यक्रमाच्या प्रांरभी मा. योगगुरुच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करुन नारळ वाढवण्यात आले. मा.योगगुरुंचा सत्कार प्राथमिक शाळेचे *मुख्याध्यापक मा.श्री. सुनिल रामधन राठोड* सरांनी मानाचा शाल व श्रीफळ देवुन केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना *योगाभ्यासाची विद्यार्थ्यांसाठी गरज* यावर वसतिगृह अधिक्षक मा.श्री.बालासाहेब कराड सरांनी संबोधीत केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतिगृह अधिक्षीका श्रीमती जाधव मॅडम, महादेव घुले, प्रदीप पवार ई. वसतिगृह कर्मचारी व वसतिगृह विभाग विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी मुख्यमंत्री चि.कृष्णा जाधव, चि. अंकुश राठोड, नैतिक थोरात, राम लांब व ईतरांनी बहुमोल परिश्रम घेतले. शेवटी आयोजक वसतिगृह अधिक्षकांनी योगगुरु पांचाळ गुरुजी, संस्थाचालक, प्राथ. व माध्य. मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद चे आभार मानुन शिबीराची सांगता केली.