आश्रमशाळेतील वसतिगृहात

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील वसतिगृहात राहुन बनला फौजदार

By admin

July 03, 2022

अंबाजोगाई, महाराष्ट्र शासनामार्फत विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समाजाच्या मुलांची शिक्षणाची राहण्याची सोय व्हावी म्हणुन अंबाजोगाईतील कै.वसंतराव नाईक प्राथ.व माध्यमिक आश्रमशाळा आनंदनगर येथे चालविली जाते.

बीड जिल्हयातील धारुर डोंगरपट्टातील मैंदवाडी गावचा सामान्य उसतोड मजुराचा अशोक मधुकर मैंद याने आश्रमशाळेतील वसतिगृहात राहून आपले फौजदार होण्याचे स्वप्न साकार केले आहे.

प्राथमाध्यमिक शिक्षणाचा पाया पक्का करत आश्रमशाळेतुन पुढे जात कुठला क्लास न लावता किंवा डोनेशनची ऐपत नसताना अत्यंत कठिण परिस्थीतीतुन मार्ग काढत प्रसंगी उसतोड मजुर आई वडिलांबरोबर मजुरी करत जिद्दीने पुढिल शिक्षण घेतो. व राज्यसेवेमधुन चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होत व प्रशिक्षण पुर्ण करुन पोलीस प्रशासनात फौजदारपदी रुजु होतो. हि नक्कीच संस्था शाळा व गुरुजन वर्गासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

आश्रशाळेचा माजी विद्यार्थी अशोक मधुकर मैंद यांनी मुंबई येथे पोलिस उपनिरिक्षक पदी रुजु झाल्यानंतर आपल्या जुन्या आश्रमशाळेतील वसतिगृहात गोड कटु आठवणींना उजाळा देत आश्रमशाळेच्या वतीने सत्काराला उत्तर देतांना मुलांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक वृंदाचे व वसतिगृह कर्मचार्यांच्या आशिर्वादाने मी घडलो. हे सांगत असताना वसतिगृहात मुलाबरोबर खोड्या काढता पकडले जावुन वसतिगृह अधिक्षक कराड सरांकडुन शिक्षा मिळायची.

आश्रमशाळेतील सर्वच गुरुजनांनी शैक्षणीक पाया भक्कम केल्याने मी विना क्लास करताच स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालो. त्यामुळेच माझ्या हातात फौजदार पदाच्या पोलिस प्रशासन सेवेच्या रुपाने हातात काठी आलीय त्या काठीचा वापर कायद्याचा सन्मान ठेवुन सन्मार्गासाठी लोक कल्यानासाठी करेन असे मत शाळेचे माजी विद्यार्थी अशोक मैंद यांनी व्यक्त केले.

सोबत मित्र व त्यांच्या अडीअडचणीच्या स्पर्धापरिक्षा काळातील सच्चे भागीदार रुममेट व त्यांच्यासोबतच पोलिस उपनिरिक्षक म्हणुन नव्याने रुजु झालेले  कृष्णा कावळे  यांचाही शाळेच्या वतीने मु.अ. संतोष राठोड यांनी सत्कार केला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सत्कारमुर्तीचे व प्रमुख पाहुन्यांचे आभार मा. देशमुख पी आर सर यांनी व्यक्त केले