अहमदनगर डॉक्टर्स डे

आरोग्याची काळजी

अहमदनगर डॉक्टर्स डे निमित्ताने डॉक्टरांनी केली मांजरसुंबागडाची स्वच्छता

By admin

July 03, 2022

 

अहमदनगर डॉक्टर्स डे च्या निमित्तानं औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर शाखेच्या  वतीने आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरसुंबा गड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मांजरसुंबा हे अहमदनगर पासुन जवळच असलेले निसर्गरम्य आणि ऐतिहासिक  ठिकाण आहे. या ऐतिहासिक ठिकाणाच्या परिसरात  प्लास्टिक बॉटल्स आणि आवरणे इत्यादी मुळे गलिच्छ झाला होता.  अहमदनगर शहराचे सुजाण नागरिक म्हणून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची संधी आणि त्यातूनच  या ऐतिहासिक  ठिकाणची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

अहमदनगर डॉक्टर्स डे

याप्रसंगी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अहमदनगर शाखेचे सेक्रेटरी डॉक्टर सचिन पांडुळे यांनी सांगितले की,आपलं नगर हे एक ऐतिहासिक आणि सुंदर शहर आहे म्हणून सामाजिक भावनेतून  इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर चे डॉक्टर्सनी आणि नागरिकांनी  सकाळच्या आरोग्यदायी हवेमध्ये योगासना बरोबरच परिसर स्वच्छता ही केली.  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला विंग्स  अध्यक्ष डॉ रेणुका पाठक यांनी सांगितले की, इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर च्या माध्यमातून यापुढे समाजपयोगी  उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

अहमदनगर डॉक्टर्स डे या उपक्रमात डॉ सचिन पांडुळे डॉ नरेंद्र  वानखेडे डॉ रेणुका पाठक डॉ सारिका बांगर डॉ प्राजक्ता पारदे डॉ सोनल बोरुडे डॉ विक्रम पानसंबळ डॉ स्मिता शिंदे डॉ सेना शहनाज आयुब  डॉ दीपा मोहोळ  डॉ सोनाली वानखेडे डॉ जुली वानखेडे  डॉ  स्मिता पठारे  डॉ आदिती पानसंबळ आदि  तसेच पोलीस  अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.