ताज्या बातम्या

अंभोरा आठवडच्या घाटात स्विफ्ट डिझायर गाडी थेट खाईत

By admin

January 16, 2023

धानोरा

नगर- जामखेड रस्त्यावरील आष्टी तालुक्याच्या हद्दीवरील अंभोरा-आठवडच्या घाटात स्विफ्ट डिझायर गाडी थेट खाईत कोसळल्याची घटना रात्री उशिरा घडली. या गाडीतील प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

कड्याकडून नगरकडे जाणारी स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 15 CT 5130 या क्रमांकाची गाडी आठवडच्या घाटात टर्न न बसल्याने थेट वळणावरुन् थेट खाली कोसळली. या वळणावर न दिसणारा कठडा  आहे .या दगडी कठडा तोडून खाली कोसळली . ही गाडी अलगत पडल्याने प्रवासी जखमी झाले. ही घटना उशिरा घडल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

या घाटात अपघात घडण्याचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी घाटाची माहिती देण्याची फलक लावण्याची आवश्यकता आहे.