ताज्या बातम्या

अभिषेक कुलकर्णी मुडेगावकर याची लेफ्टनंट पदासाठी निवड

By admin

January 14, 2023

अभिषेक कुलकर्णी मुडेगावकर याची लेफ्टनंट पदासाठी निवड

अंबाजोगाई:-(प्रतिनिधी):- तालुक्यातील मुडेगाव येथील रहिवाशी अभिषेक उपेंद्र कुलकर्णी(मुडेगावकर) याची भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सप्टेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन आर्मी च्या परीक्षा मध्ये लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे.

या परीक्षेसाठी भारतातुन साडेतीन लाख विध्यार्थी बसले होते.त्यापैकी 135 विध्यार्थी उतीर्ण झाले असून अभिषेक चा रँक क्रमांक 68 वा आहे.येत्या एप्रिल मध्ये तो ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे प्रशिक्षनासाठी जाणार आहे.

अभिषेक हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील औरंगाबाद येथील उप अभियंता श्री उपेंद्र माधवराव कुलकर्णी मुडेगावकर याचा सुपुत्र आहे.अभिषेक यांच्या निवडी बद्दल सर्व नातेवाईक, मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.